‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा उर्फी सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. तिच्या वेगळ्या फॅशन सेन्समुळे तिला ट्रोल करण्यात येत असले तरी देखील उर्फी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या वेळई उर्फी फॉर्मल ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. उर्फीने तिचा हा फॉर्मल ड्रेससुद्धा अनेक ठिकाणांवरून कापला आहे. त्यानंतर ट्रोल्सने तिला पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत उर्फीने पेस्टल निळ्या रंगाचा फॉर्मल ड्रेस परिधान केला आहे.

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

आणखी वाचा : “घटस्फोटित सेकंड हँड…”, म्हणणाऱ्या ट्रोलरला समांथाचे सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘कोण बनवतं असे विचित्र कपडे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कोणी हिला वेब सीरिजमध्ये काम द्या नाहीतर तिचे प्रत्येक व्हिडीओमध्ये कपडे छोटे होत जातील.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बकवास.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘फॅशनतच्या नावावर कसे विचित्री कपडे परिधान करते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अरे हा कोणता प्राणी आहे’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.