बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी तिची फॅशन तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे उर्फीच्या नावाची चर्चा होताना दिसते. अनेकदा ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त विधानांमुळेही चर्चेचा विषय ठरते. आताही असंच काहीसं घडलं आहे. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. विशेषतः या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.

उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका फोटो शेअर करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीत सहभागी झाल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. उर्फीला हा फोटो तिच्या चाहत्यानं पाठवलेला आहे. ज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बैठक घेताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर सुरू असलेल्या टीव्ही त्याचवेळी उर्फीशी संबंधीत बातमी दाखवली जात आहे.

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Wardha, complaint of Ramdas Tadas
वर्धा : बनावट व्हिडीओ प्रसारित करणे भोवले, रामदास तडस यांच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या अ‍ॅडमीनवर गुन्हे दाखल
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या बातमीत उर्फी जावेद निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर फोटो शेअर करताना उर्फीनं लिहिलं, ‘योगीजींसोबत या बैठकीत सहभागी झाल्याचा आनंद आहे. कोणीतरी हा फोटो मला पाठवला जो पाहिल्यानंतर मला खूप हसू आलं.’ अर्थात उर्फी खरंच मुख्यमंत्री योगीनाथ यांच्या बैठकीत सहभागी झाली नव्हती. पण हा फोटो मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मूळची लखनऊची असलेली उर्फी जावेदनं २०१६ साली ‘बड़े भैया की दुल्‍हनिया’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पाच वर्षांच्या आपल्या अभिनय कारकिर्दीत तिने जवळपास १० मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच ती नव्यानं सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. ज्यानंतर तिच्या लोकप्रियतेत भर पडली आहे.