उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधील वाद आणखीनच चिघळला आहे. उर्फीच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. “उर्फी समोर आल्यास तिला थोबडवणार” असंही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. आता उर्फीनेच चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आणखी वाचा – विश्लेषण: ‘नंगटपणा’ मुळे उर्फी जावेदवर कारवाई होऊ शकते? अश्लीलतेबाबत कायदा काय सांगतो?

दरम्यान उर्फीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या मानसिक आरोग्याबाबत बोलताना दिसत आहे. शिवाय उर्फीला तिच्या कपड्यांवरुन सतत ट्रोल करण्यात येतं. पण याचा उर्फीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो असं तिचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – अंगप्रदर्शन करणं महागात पडलं, उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस

काय म्हणाली उर्फी जावेद?

‘आय दीवा’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगबाबत बोलताना उर्फी म्हणाली, “जर कोणी तुम्हाला सतत शिवीगाळ करत असले तर त्याचा मानसिक आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. बाहेर जेव्हा मी बघते एखाद्या मुलीने वेगळी फॅशन केली तर तिलाही विचित्र पद्धतीने बोललं जातं. खासकरुन भारतात कपड्यांवरुन मुलींना शिवीगाळ केली जाते.”

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुझे आई-वडील काही बोलत नाहीत का? असंही बोललं जातं. तुम्ही या ट्रोलिंगला काहीच करू शकत नाही. परिणामी नैराश्याचा सामना करावा लागतो. माझ्याकडून कोणताच वाद नाही. लोक मला माझ्या कपड्यांवरुन बोलतात. फक्त एकच गोष्ट आहे की मी गप्प बसू शकत नाही.” ट्रोलिंगचा उर्फीवर परिणाम होतो असं तिचं म्हणणं आहे.