अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ आणि आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हे चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे सध्या चर्चेत आहेत. प्रत्येकजण या चित्रपटांबद्दल बोलताना दिसत आहे. अशातच इंटरनेट सेन्सेशन आणि बेधडकपणे आपलं मत मांडणारी अभिनेत्री उर्फी जावेदने अक्षयच्या रक्षा बंधन चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट जुन्या काळातला आहे, असं उर्फीने म्हटलंय. तसेच अक्षयने हा चित्रपट आता का बनवला, असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे.

एका मुलाखतीत उर्फीला अक्षयच्या रक्षा बंधन चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उर्फी म्हणाली, “मी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. हा चित्रपट ३० वर्षांपूर्वी रिलीज व्हायला हवा होता, आता का रिलीज होतोय. मला माफ करा पण बहिणीचं लग्न आणि तिच्या हुंड्यासाठी पैसे जमवणं या ३० वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. आता असे चित्रपट यायला हवे, ज्यामध्ये बहिण आपल्या भावाला म्हणत असेल की माझ्या लग्नाची चिंता करणे सोडून द्या. मला काम करून पैसे कमवायचे आहेत. तुम्ही तुमचं पाहा, माझं मी बघेन.” उर्फीने अक्षयच्या चित्रपटावर दिलेली ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे.

हेही वाचा – ‘हिला दगड मारा’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना उर्फीचं हटके उत्तर; दगडांपासून बनवला ड्रेस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फी फक्त रक्षा बंधन चित्रपटावरच बोलली नाही, तर आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाबद्दलही तिने प्रतिक्रिया दिली. “मी आमिर खानचा चित्रपट अजून पाहिलेला नाही, पण लवकरच मी तो चित्रपट पाहीन. आमिर खानचे चित्रपट चांगले असतात आणि मला पाहायला आवडतात,” असं उर्फी म्हणाली.

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांव्यतिरिक्त बोल्ड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिला कपड्यांवरून नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. पण उर्फी त्याची पर्वा न करता विचित्र कपड्यांमधील फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.