बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या भूमिकांपेक्षा लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. तिचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडण्यात आले होते. दरम्यान उर्वशी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेट करत असल्याची देखील चर्चा रंगली होती. आता ऋषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले आहे.

ऋषभ पंतने सोशल मीडियावर गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतचा फोटो शेअर करत उर्वशीसोबत असलेल्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्यामुळे ऋषभच्या आयुष्यात उर्वशी नसून ईशा आहे हे स्पष्ट झाले आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार उर्वशी सतत ऋषभला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे ऋषभने तिला ब्लॉक केले आहे. त्या दोघांनी परस्पर सामंजस्यने हा निर्णय घेतला असल्याचे उर्वशीच्या स्पोकपर्सनने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

locking down deals etc…… . . . . . . . . . . . . . . . #love #UrvashiRautela #Dubai #UAE

A post shared by URVASHI RAUTELA Actor (@urvashirautela) on

उर्वशी आणि ऋषभ पंत १० डिसेंबर २०१९ रोजी ११च्या सुमारास डेटवर गेल्याचे म्हटले जात आहे. हे दोघे जुहूमधील ईस्टेला हॉटेलमध्ये एकत्र डिनर करताना दिसले. विशेष म्हणजे T20 मॅच सुरु होण्याच्या एक दिवसआधी डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण ऋषभने गर्लफ्रेंड सोबतचा फोटो पोस्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

 

View this post on Instagram

 

I like me better when I’m with you

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on

काही दिवासांपूर्वी उर्वशीचा ‘पागलपंती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, अरशद वारसी, कृती खरबंदा, पुलकित सम्राट आणि इलियाना डिक्रूज हे कलाकार झळकले होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता लवकरच उर्वशी एका तामिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशी गणेशन करत आहेत.