बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या दुबईत सुरू असलेल्या आशिया कपच्या अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये दिसत आहे. आतापर्यंत उर्वशीचे नाव भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत जोडले जात होते. पण आता उर्वशीनेच पाकिस्तानी क्रिकेटरसह असा व्हिडीओ शेअर केला आहे की तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. उर्वशी आणि ऋषभ यांच्यातील सोशल मीडिया वादाची बरीच चर्चा झाली होती. पण आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक रोमँटिक रील शेअर केली आहे. पण या रीलमध्ये ऋषभ नाही तर पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह दिसत आहे. या रीलनंतर उर्वशी प्रचंड ट्रोल होत आहे.

उर्वशीने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे, ज्यामध्ये ती क्रिकेट मॅच पाहताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह उर्वशीला स्क्रीनवर पाहून लाजताना दिसत आहे, तर उर्वशीही लाजताना दिसत आहे. उर्वशीने आता तिच्या इन्स्टाग्रामवरून ही स्टोरी हटवली असली तरी आता अनेक फॅनपेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरून नेटकरी उर्वशीला ट्रोल करत आहेत. काहीजण तिला नसिमपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. काहींनी याचं कनेक्शन पुन्हा एकदा ऋषभ पंतशी जोडलं आहे.
आणखी वाचा- Asia Cup T20 : भारताच्या पराभवानंतर उर्वशी रौतेलावर भडकले नेटकरी, म्हणाले “ही ऋषभ पंतसाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मागच्या काही काळापासून उर्वशी रौतेलाचे नाव ऋषभ पंतसोबत जोडले जात होते, पण अलिकडेच सोशल मीडियावर दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे याला वेगळे वळण मिळाले. उर्वशी रौतेलाने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत ‘मिस्टर आरपी’चा उल्लेख केला, त्यानंतर क्रिकेटर संतापला होता. उर्वशीने तिच्या मुलाखतीत, ‘ऋषभ पंतने तिला भेटण्यासाठी खूप वाट पाहिली होती’ असं म्हटलं होतं. त्यानंतर ऋभषने अभिनेत्रीवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. यानंतर पंतने हॅशटॅग वापरून ‘ताई कृपया माझा पाठलाग करणं सोड खोटं बोलण्यालाही मर्यादा असते’ असं लिहिलं होतं.