‘मितवा’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि मालिकांमधून चित्रपटसृष्टीकडे वळलेला अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातून एकत्र दिसणार आहे. विशेष म्हणजे हे दोघे ख-या आयुष्यातही मिस्टर अॅण्ड मिसेस बनणार असल्याची चर्चा आहे.
टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघे ख-या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात असून लवकरचं ते लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे. मात्र, या दोघांकडून याबद्दल अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. कॉफी आणि बरचं काही चित्रपटातून या दोघांची जोडी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्यानंतर आता हे मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारीमध्ये एकत्र झळकतील.
‘मिस्टर अॅण्ड मिसेस’ रामचारी या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेला ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ पुढील वर्षी जानेवारी प्रदर्शित होईल.