‘फक्त मराठी’वर व्हॅलेंटाईन स्पेशल

प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्व प्रेमीजण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात तो व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिवसाचे औचित्य साधत ‘फक्त मराठी’ वाहिनीने ‘व्हॅलेंटाईन डे स्पेशल’ चित्रपटांसोबत एक झक्कास संधी तुमच्यासाठी आणली आहे, ती म्हणजे तुमच्या प्रिय व्यक्तीला व्हॅलेंटाईनचा मेसेज देणारा व्हिडीओ तुम्हाला ७७१००८८४४५ या व्हॉटसअप नंबरवर पाठवायचा आहे. यातील भाग्यवान विजेत्यांचे उत्कृष्ट मेसेज व्हिडीओ व्हॅलेंटाईन डे दिवशी ‘फक्त मराठी’वर दाखविण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फक्त मराठी’ वर ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ‘व्हॅलेंटाईन विशेष आठवडा’ साजरा होणार असून यात दररोज सायंकाळी ६.०० वा. प्रेमपटांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. यात ११ फेब्रुवारीला ‘घायाळ’, १२ फेब्रुवारीला ‘नवरा माझा भवरा’, १३ फेब्रुवारीला ‘स्लॅमबुक’, १४ फेब्रुवारीला ‘नवरी मिळे नवऱ्याला’, १५ फेब्रुवारीला ‘कशासाठी प्रेमासाठी’, १६ फेब्रुवारीला ‘गौरी’ व १७ फेब्रुवारीला ‘लपून छपून’ या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. ‘फक्त मराठी’ वाहिनी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘फक्त मराठी’ वर आपल्या जोडीदारासाठी व्हॅलेंटाईन व्हिडीओ मेसेज पाठवण्याची संधी नक्कीच हटके ठरणार आहे. यात फोटो दिसत नसला तरी तुमचा व्हिडीओ मेसेज तुमच्या प्रिय व्यक्ती पर्यंत निश्चित पोहोचेल. ‘फक्त मराठी’ वर.