दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांनी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने लग्नगाठ बांधली. इटलीतील लेक कोमा येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. दीप-वीरचं लग्न झाल्यापासून ही जोडी सतत या ना त्या कारणासाठी चर्चेत येत आहे. नुकतीच ही जोडी लंडन टूरवर गेली असून या टूरदरम्यान त्यांनी एका सेलिब्रिटीला दत्तक घेतल्याचं समोर आलं आहे. सध्या दीपिका-रणवीर आणि त्यांच्या दत्तक सेलिब्रिटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दिपिका -रणवीर या जोडीने अभिनेता वरुण धवनला दत्तक घेतलं असून या तिघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वरुणने मजेशीर अंदाजात दीपिका-रणवीरला त्याचे दत्तक पालक असं संबोधलं आहे. त्यासोबतच दिपिका आपली किती काळजी घेते हेदेखील त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
View this post on Instagram
@varundvn @deepikapadukone @ranveersingh #varundhawan #natashadalal #natashadalallabel
दरम्यान, दिपिका-रणवीर सध्या लंडनला फिरायला गेले आहेत. तर वरुण त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी गेला आहे.यादरम्यान हे तिघं एकमेकांना भेटले असून त्यांनी मजेमध्ये हा व्हिडिओ तयार केला आहे.
वरुण त्याच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’चं अपूर्ण राहिलेलं चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेला आहे. वरुणचा ‘कलंक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर वरुण लगेचच लंडनला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या कलंकमध्ये वरुणसोबत आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर ही स्टारमंडळी झळकणार आहे.