बॉलीवूडचा युवा अभिनेता वरूण धवनला आपल्या आगामी ‘एबीसीडी २’ चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली आहे. मूळ ‘एबीसीडी’ चित्रपटाचा सिक्वल असलेला ‘एबीसीडी २’ चित्रपट संपूर्णपणे नृत्यकौशल्यावर आधारित असल्याने या चित्रपटात वरुणला साहसी नृत्यप्रकार सादर करावे लागत आहेत. दरम्यान, चित्रपटातील एका प्रसंगावर चित्रीकरण करत असताना वरुणच्या पाठीला दुखापत झाली. पण, चित्रीकरणात अडथळा येऊन चित्रीकरण थांबू नये म्हणून वरूणने त्वरित इंजेक्शन घेऊन चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसभराचे चित्रीकरण पूर्ण केले. त्यानंतर वरुण सध्या आपल्या घरी विश्रांती घेत असून डॉक्टरांनी त्याला आठवड्याभराचा आराम घेण्याचा सल्ला दिला आहे.
चित्रीकरणादरम्यान दुखापत होण्याची वरुणची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही वरुणला ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटांच्या चित्रीकरणावेळी दुखापतींना समोरे जावे लागले होते. ‘एबीसीडी २’ च्या चित्रीकरणातही याआधी त्याला किरकोळ दुखापती झाल्या आहेत. ‘एबीसीडी २’ चे दिग्दर्शन प्रसिध्द कोरिओग्राफर रेमो डिसुझा करत असून या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री श्रध्दा कपूर मुख्यभुमिकेत दिसणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2014 रोजी प्रकाशित
‘एबीसीडी २’च्या सेटवर वरुण धवनला दुखापत
बॉलीवूडचा युवा अभिनेता वरूण धवनला आपल्या आगामी 'एबीसीडी २' चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली आहे. मूळ 'एबीसीडी' चित्रपटाचा सिक्वल असलेला 'एबीसीडी २' चित्रपट संपूर्णपणे नृत्यकौशल्यावर आधारित असल्याने या चित्रपटात वरुणला साहसी नृत्यप्रकार सादर करावे लागत आहेत.

First published on: 22-09-2014 at 06:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan suffers back injury on the sets of abcd