पुलकित सम्राट, जिमी शेरगिल आणि क्रिती खरबंदा स्टारर ‘वीरे की वेडिंग’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये पुलकित सम्राट रावडी आणि चॉकलेट बॉय अशा दोन्ही इमेजमध्ये दिसतोय. तर ट्रेलरमध्ये जिमी शेरगिलवरून नजर हटत नाही. या ट्रेलरमध्ये क्रिती खरबंदा फारच सुंदर दिसते. ट्रेलरमध्ये दाखवले आहे की, वीर अरोडा (पुलकित सम्राट) लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारा असतो. तो गीतच्या अर्थात क्रितीच्या प्रेमात पडतो. गीतला भेटण्यापूर्वी तो अनेक मुलींना ताटकळत ठेवत असतो. पण इतर मुलींसारखी गीत नसल्यामुळे ती वीरेची आयुष्यभर वाट पाहण्यास नकार देते.

या सिनेमात जिमी पुलकीतचा मोठा भाऊ बल्ली दाखवला आहे. तो सिनेमात वीरेला मुलींच्या मागे जास्त न पळण्याचा सल्ला देतो. सिनेमात जिमीच्या तोंडी एकाहून एक सरस संवाद देण्यात आले आहेत. सिनेमात शायरी बोलताना तो म्हणतो की, ‘अपनी चौखट का चिराग जले न जले यारों का आशियां रौशन रहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीरला दुःखात पाहून बल्ली राहू शकत नाही. म्हणूनच तो मुलीच्या घरी जाऊन दोघांचे लग्न लावून देण्यासाठी जबरदस्ती करतो. तर गीत अर्थात क्रिती वीरेसोबत लग्न करण्यास नकार देते. या सगळ्यात गीत वीरेला होकार देणार का? गीतने लग्नाला होकार दिला तरी तिच्या वडिलांना हे लग्न मान्य होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वीरे की वेडिंग सिनेमा पाहूनच मिळतील.