ज्येष्ठ अभिनेते सतींदर कुमार खोसला यांचे मंगळवारी सायंकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. ते बिरबल या नावाने प्रसिद्ध होते. खोसला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”

चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह अनेकांनी सतींदर कुमार खोसला यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) ट्वीट करून बिरबल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

१९३८ मध्ये जन्मलेल्या बिरबल यांना व्ही शांताराम यांच्या १९६७ मधील जितेंद्र आणि मुमताज यांच्या भूमिका असलेल्या ‘बूंद जो बन गई मोती’ चित्रपटातून पहिला मोठा ब्रेक मिळाला. बिरबल यांनी त्यांच्या करिअरमध्ये ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यात त्यांच्या बहुसंख्य भूमिका विनोदी होत्या. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी पंजाबी, भोजपुरी आणि मराठी चित्रपटांमध्येही अभिनय केला होता.

“लाज नाही वाटत का?” करणच्या लग्नासाठी आलेल्या पाहुण्यावर चिडलेला सनी देओल; खुलासा करत म्हणाला, “घरात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘क्रांती’सह मनोज कुमारच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘शोले’ मध्ये त्यांनी एका कैद्याची भूमिका केली होती. तसेच ‘अनुरोध’मध्ये त्यांनी ड्रग व्यसनीची भूमिका केली होती. ‘आराधना’, ‘मेरा नाम जोकर’, ‘जुगारी’, ‘अमर प्रेम’, ‘चरस’, ‘विश्वनाथ’, ‘अखियों के झरोखों से’, ‘कर्ज’, ‘क्रांती’, ‘नसीब’, ‘याराना’, ‘सदमा’, ‘बेताब’, ‘दिल’, ‘बोल राधा बोल’, ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटांचा समावेश आहे. ते शेवटचे २०२२ मध्ये आलेल्या ‘१० नही ४०’ मध्ये दिसले होते.