ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत सुधारली होती. मात्र बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. विजय चव्हाण यांच्या निधनानंतर मनोरंजन तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ट्विटवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत विजय चव्हाण यांचे जाणे मनाला चटका लावून गेल्याची भावना व्यक्त केली. तसेच ते सदैव चाहत्यांच्या लक्षात राहतील असेही अनेकजण आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

ही एक्सीट मनाला हळहळ लावणारी :विनोद तावडे

विजू मामा गेला: सुबोध भावे

भूमिका कोणतीही असो हा कलाकार तिचं सोनं करीत असे: सुप्रिया सुळे</strong>

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तारा हरपला: धनंजय मुंडे</strong>

ते कायम चाहत्यांच्या स्मरणात राहतील: राधाकृष्ण विखे पाटील

ते पात्र माझ्या सदैव लक्षात राहील: जयंत पाटील</strong>

आमच्या काळातील रॉकिंग कलाकार: आरजे जितूराज

अद्वैत थिएटर्सकडून भावपूर्ण श्रद्धांजली

ही बातमी धक्कादायक आहे: आर.जे. अशोक

भावपूर्ण श्रद्धांजली : निलेश राणे

आज दुपारी बारा वाजता मुलुंडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.