बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनं लग्नानंतर काही दिवसांतच त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. सध्या विकी कौशल अभिनेत्री सारा अली खानसोबत इंदोरमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. पण या शूटिंग दरम्यान नुकताच तो एका वादात अडकलेला पाहायला मिळाला होता. विकीच्या विरोधात एका इंदोरमध्ये एका व्यक्तीनं तक्रार दाखल केली होती. कोणतीही परवानगी न घेता विकी कौशल आणि त्याच्या टीमनं आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर वापरल्याचं या व्यक्तीनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. पण आता हा मिटला असून इंदोर पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकी कौशलच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत स्पष्टीकरण देताना पोलीस म्हणाले, ‘यात बेकायदेशीर अशी कोणतीही गोष्ट नाही. जी बाइक आणि नंबर प्लेट या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरण्यात आली होती. ती बाइक प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित एका कर्माचाऱ्याची होती. पण यावर एक बोल्ट लावला होता ज्यामुळे १ हा अंक ४ सारखा दिसत होता. त्यामुळे हा सर्व गोंधळ झाला.’

पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र सोनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, ‘नंबर प्लेटची तपासणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की, यात सगळा गोंधळ हा त्यावर लावलेल्या बोल्टमुळे झाला आहे. त्यामुळे हा नंबर १ असूनही ४ सारखा दिसत होता. चित्रपटात वापरण्यात आलेली बाइक ही प्रॉडक्शन हाऊसची आहे आणि यात कोणतीही गोष्ट बेकायदेशीर नाही.’

दरम्यान काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या इंदोर शूटिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर एका स्थानिक रहिवासी जय सिंह यादव यांनी विकीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या चित्रपटात वापरण्यात आलेली बाइक त्यांची आहे आणि यासाठी कोणतीही परवानगी न घेता या बाइकचा चित्रपटात वापर करण्यात आला. हे बेकायदेशीर आहे. असं जय सिंह यादव यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vicky kaushal bike number plate controversy indore police solve the case mrj
First published on: 03-01-2022 at 14:33 IST