अभिनेता विकी कौशलचे वडील शाम कौशल बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक आहेत. शाम कौशल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना झालेल्या कर्करोग आजाराबद्दल खुलेपणाने सांगितलं. २००३ साली ‘लक्ष्य’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ते घरी परतले. त्यादरम्यान शाम यांना पोटदुखीचा सामना करावा लागला. त्रास अधिक वाढल्याने त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांना कशाप्रकारे मदत केली हे शाम यांनी सांगितलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शाम कौशल यांनी कर्करोगाचे निदान झाले, त्या दिवसांबद्दल सांगितले. ते म्हणाले, “पोटात असह्य वेदना होत असल्याने मला नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याअगोदर मला अपेंडिक्स हा आजार झाला होता. तेव्हा मी अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत अपेंडिक्सवरील उपचारासाठी त्याच रुग्णालयात गेलो होतो. त्यामुळे यावेळी जेव्हा मला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी नाना पाटेकर यांना फोन करून याची कल्पना दिली. त्यावेळी नाना पुण्यात चित्रीकरण करत होते. ते चित्रीकरण थांबवून नाना मला भेटायला रूग्णालयात आले.”

आणखी वाचा – कतरिनाच्या या बोल्ड फोटोवर सासऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, ...

“मी बेशुद्ध अवस्थेत होतो. त्याचदरम्यान मला कर्करोगाचं निदान झालं असल्याचं समोर आलं. जवळपास ५० दिवस मी रूग्णालयात भरती होतो. मी जगेन की नाही याबद्दल मला शंका होती. पण सुदैवाने मी बरा झालो. त्यानंतर वर्षभर माझ्या टेस्ट सुरू होत्या. या घटनेला १९ वर्ष झाली आहेत.” असे त्यांनी सांगितले

त्या कठीण प्रसंगात साथ दिलेल्या व्यक्तींबद्दल देखील शाम कौशल यांनी सांगितले. ते म्हणाले, “तो खूप कठीण काळ होता. कर्करोगाचे निदान व्हायच्या आधीच मी एक चित्रपट साइन केला होता, ज्याच चित्रीकरण नोव्हेंबरपासून सुरू होणार होतं आणि ऑक्टोबरमध्ये मला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढे काय होईल याची काहीच कल्पना नव्हती. आत्महत्या करण्याचे विचार माझ्या मनात यायचे. मला बेडवरून हलणं सुद्धा शक्य होत नव्हतं. मी ईश्वराकडे हे सगळ संपवण्याची प्रार्थना करायचो. मला कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं. एका लहान गावातून आलेलो असूनही परमेश्वराच्या कृपेने मी चांगल आयुष्य जगत होतो. फक्त मला कमजोर व्हायचे नव्हते यासाठी मी प्रार्थना करायचो.”

आणखी वाचा – विकी कौशलला एक्स गर्लफ्रेंडनं नाव न घेता मारला टोमणा, …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दुसऱ्या दिवशी मी चित्रपटासाठी घेतलेली रक्कम परत करण्याचे ठरवून प्रोडक्शनला फोन केला. परंतू त्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘हा चित्रपट तुम्हीच करणार आणि आम्ही तुमच्यासाठी वाट बघू’ असा मेसेज मला पाठवला. ते स्वतः त्या काळात संघर्ष करत असून देखील ५० दिवस त्यांनी चित्रीकरण थांबवले. मी रूग्णालयातून घरी परतल्यानंतर पहिला चित्रपट त्यांच्यासोबत केला. ज्याचं नाव होत ‘ब्लॅक फ्रायडे’,” शाम कौशल यांच्यासाठी हा प्रवास संघर्षमय होता.