मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक रवी जाधव आगामी बँजो चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर नुकताचं प्रदर्शित करण्यात आला. ‘बँजो की दुनिया का #बच्चन’ असे म्हणत रवीने आपल्या पहिल्या बॉलीवूड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि नर्गिस फाख्री यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या टीझरमध्ये अभिषेक बच्चनच्या दमदार आवाजात रितेश देशमुखच्या भूमिकेचा परिचय करून देण्यात आला आहे. इस का हाथ किसीपे पडे तो आदमी हिल जाता है, और बँजो पे पडे तो भी आदमी हिल जाता है…. या वाक्यावर रितेश देशमुखची एण्ट्री दाखविण्यात आली आहे. तसेच, या टीझरमध्ये नर्गिस फाख्रीचा मराठमोळा लूकही पाहावयास मिळतो.
बँजो विषयी दिग्दर्शक रवी म्हणाला की, नटरंगच्या प्रमोशनसाठी सोलापूरला गेलो होतो. रस्त्यात एका लग्नाच्या वरातीत बँजो वाजवणारी तरुण मुले पाहिली. बेफाम वाजवणारी पण तोंडाने पैसे उचलणारी. त्याचवेळी या मुलांवर आधारित चित्रपट साकारायचे ठरवले. गेली १०० वर्षे महाराष्ट्रातील प्रत्येक आनंदाची गोष्ट आपण यांच्या संगीताच्या तालावर साजरी करतो पण त्यांच्या कलेचा अजूनही सन्मान व्हावा तसा झाला नाही. प्रयत्न सुरु झाले पण प्रत्यक्ष साकारायला ५ वर्ष लागली. गणपती बाप्पा मोरया!!!
#BanjoTeaser -Thank you so much brother @juniorbachchan https://t.co/3Uvl5sJMlO
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 30, 2016
