कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता कपिल शर्मा नेहमीच त्याच्या सह-कलाकारांसोबत मस्करी करताना दिसतो. मग ते त्याचा लहानपणीचा मित्र चंदन असो किंवा ‘द कपिल शर्मा’ची स्पेशल जज अर्चना पुरण सिंग असो. कपिलच्या या शोवर अनेक लोकप्रिय कलाकार हजेरी लावतात. तसंच ते त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ विषयी अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. कपिलही हा शो इंटरेस्टिंग बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन मजेदार विनोद तयार करतो.
काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कपिल शर्माच्या शोमध्ये परत येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. शोमध्ये ही कपिल अनेकदा अर्चना यांना सिद्धू यांची जागा घेतल्याबद्दल चिडवताना दिसला आहे. याचं दरम्यान कपिलचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये, नवज्योत सिंह यांनी एन्ट्री घेतली होती.
‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पाहूणे म्हणून आशुतोष राणा, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा ‘हंगामा 2’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते, यावेळीस सगळेच एकमेकांची मस्करी करताना दिसले. कपिल शर्मा सिद्धू यांच्या गेटअपमध्ये येऊन अर्चना यांना चिडवताना दिसला. अर्चना देखील कपिलच्या या मस्करीचा आनंद घेताना दिसली. कपिल शर्माचा अनोखा गेटअप सर्वानाच आवडला व त्याच्या प्रत्येक विनोदावर प्रेक्षक मनसोक्त हसताना दिसले. दरम्यान नवज्योत यांच्या राजीनाम्यानंतर त्याच्या शोमध्ये परत येण्याविषयी सोशल मीडियावर असंख्य मीम्स व्हायरल झाले आहेत. अर्चना यांनी देखील काही मीम्स त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांनी हे मीम्स शेअर करत ‘किस्सा खुर्ची का’, असे कॅप्शन दिले होते.