एस.एस.राजामौली हे सध्या भारतातील सर्वात्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांच्या ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांनी इतिहास घडवला. त्यांनी ‘इगा’, ‘मगधीरा’, ‘छत्रपती’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवले आहेत. राजामौलींचे चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच असतात. त्यांच्या चित्रपटांचे चाहते जगभरामध्ये पसरले आहेत. काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाचे कौतुक परदेशातील अनेक समीक्षकांनी देखील केले होते. भारताकडून हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच पार पडलेल्या ‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चे आमंत्रण एस.एस.राजामौलींना देण्यात आले होते. आमंत्रण स्विकारत राजामौली अमेरिकेतल्या या प्रतिष्ठित सोहळ्याला पोहोचले. भारतातल्या या दिग्गज दिग्दर्शकाला भेटण्यासाठी अमेरिकेतील चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमामधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्यक्रमादरम्यान एस.एस.राजामौली मंचावर येतात आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना हात जोडून नमस्कार करतात. त्यांच्या एन्ट्रीला सभागृहामध्ये उपस्थित असलेले लोक मोठ्याने टाळ्या वाजवायला लागतात. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या या मुलाखतवजा कार्यक्रमामध्ये त्यांनी चित्रपटांबद्दलच्या त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटावरही भाष्य केले.

याच कार्यक्रमामध्ये राजामौली यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा देखील केली. ते सुपरस्टार महेश बाबू यांच्यासह पुढील चित्रपट करणार आहेत. याबद्दल बोलताना राजामौलींनी त्यांच्या या आगामी चित्रपटाला “ग्लोबट्रोटिंग अ‍ॅक्शनर” (Globetrotting actioner) अशी उपमा दिली आहे. हा चित्रपट ‘जेम्स बॉन्ड’ किंवा ‘इंडियाना जोन्स’ या चित्रपटांसारखा भव्य, पण भारतीय संस्कृतीशी जोडलेला असेल असे त्यांनी म्हटले आहे. महेश बाबू-राजामौली यांच्या या चित्रपटाची कथा जंगल अ‍ॅडवेन्चरवर आधारलेली असल्याचे ‘विजयेंद्र प्रसाद’ म्हणजेच एस.एस.राजामौलींच्या वडिलांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. विजयेंद्र प्रसाद यांनीच ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांच्या कथा लिहिलेल्या आहेत.

आणखी वाचा – जागतिक चित्रपटसृष्टीवर स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या हरहुन्नरी दिग्दर्शकाचे दुःखद निधन

राजामौलीच्या आरआरआरच्या निमित्ताने भारताला यंदा ऑस्कर मिळणार असल्याची आशा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of ss rajamoulis reception at the toronto international film festival has gone viral yps
First published on: 13-09-2022 at 18:28 IST