जागतिक चित्रपटाचा प्रत्येक चित्रपटसृष्टीवर काही प्रमाणात प्रभाव असतो. आज ओटीटीमुळे सगळं विश्व एकवटलं आहे त्यामुळे जगभरातला कोणताही चित्रपट आपण आज सहज बघू शकतो. सध्या भारतीय प्रेक्षकही कोरियन, जपानी, फ्रेंच चित्रपट अगदी आवडीने बघतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यांचा उल्लेख केल्या शिवाय जागतिक चित्रपटविश्व पूर्ण होत नाही अशा जीन-लुक गोडार्ड या फ्रेंच दिग्दर्शकाचे वयाच्या ९१ व्यावर्षी निधन झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. ६० च्या दशकात यांनी उत्तमोत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. जीन हे सर्वप्रथम उत्कृष्ट सिनेसमीक्षक होते आणि मग त्यांनी त्यांचा मोर्चा हळूहळू चित्रपटनिर्मितीकडे वळवला. आज हॉलिवूडमध्ये क्वेंटिन टॅरँटिनो तसेच मार्टिन स्कोर्सेसे यांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. या दोघा दिग्दर्शकांना चित्रपट बनवण्याची प्रेरणा जीन-लुक गोडार्डकडूनच मिळाली होती. ‘Breathless’, ‘Contempt’, ‘Alphaville’ , ‘Band of outsiders’ हे त्यांचे काही प्रचंड गाजलेले चित्रपट.

जीन-लुक गोडार्ड यांच्या निधनामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीव शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि कट्टर चित्रपटप्रेमी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. जागतिक चित्रपटावर स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या दिग्दर्शकाला भावपूर्ण आदरांजली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legendary french film director jean luc godard dies at 91 avn
First published on: 13-09-2022 at 17:15 IST