VIDEO: ‘रईस’मधील ‘धिंगाना’ गाणे

‘रईस’ शाहरुखच्या व्यक्तिमत्वाची हळवी बाजूही दिसते.

बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर आता शाहरुख खानने ‘रईस’च्या प्रमोशनसाठी थेट ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस गाठली होती. त्या दरम्यानच, या चित्रपटातील धिंगाना हे गाणे प्रदर्शित करणयात आले आहे.  शाहरुखचा निर्भिड आणि बोल्ड अंदाज या नव्या गाण्यात पाहावयास मिळतो. जगातील कोणत्याही नियमांची पर्वा न करता आपला व्यवसाय स्वतःच्या अटींवर तो यात चालवताना दिसते. चित्रपटातील इतर गाणी आणि प्रोमोजच्या तुलनेत यात ‘रईस’ शाहरुखच्या व्यक्तिमत्वाची हळवी बाजूही दिसते.

<iframe width=”100%” height=”360″ src=”https://www.youtube.com/embed/8z-WAHG6KB4&#8243; frameborder=”0″ allowfullscreen></iframe>

दरम्यान, ‘रईस’ आणि ‘काबिल’मधील युद्ध आता आणखीनच तीव्र होत चालले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये २०१७ या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट बनण्यासाठी चुरस आहे. या दोन्ही चित्रपटांच्या टीम प्रमोशनमध्येही कुठेच कमी ठेवत नाहीये. पण, प्रमोशनमध्ये रईसचे पारडे काबिलपेक्षा थोडे जड असल्याचेच चित्र दिसतेय. बादशहा शाहरुख खान त्याच्या चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी जराही कसर बाकी ठेवत नाहीये. ‘रईस’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई ते दिल्ली यांदरम्यान राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणार असल्याचे शाहरुख खानने ट्वीट केले होते. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासूनच मुंबई सेंट्रल स्थानकात गर्दी केली होती. शाहरुख खानसह या गाडीतून काही कलाकार आणि काही पत्रकारही जाणार असल्याने वातानुकूलित टू-टीअर श्रेणीचे दोन डबे आरक्षित केले होते. शाहरुखसह सनी लिओनी, फरहान अख्तर हेदेखील प्रवास करणार असल्याने चाहत्यांसाठी मुंबई सेंट्रलच्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक ‘रेड कार्पेट’ बनला होता.

लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी, जमल्यास त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी शाहरुखचा लांबून का होईना एक फोटो घेण्यासाठी चाहते पादचारी पुलापासून स्टॉलच्या टपावर जागा मिळेल तिथे उभे होते. शाहरुखचे आसन ‘ए-५’ या डब्यात आरक्षित होते. यावेळी आरक्षण यादीचे छायाचित्र घेण्यासाठीही एकच गर्दी उसळली होती. काही खासगी अंगरक्षक ही गर्दी डब्याच्या दरवाज्यावरच थोपवत होते. ‘ए-५’ या डब्याच्या बाहेर शाहरुखची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांचा अखेर हिरमोडच झाला. ५ वाजून ४७ मिनिटांनी शाहरुखने प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. निळा शर्ट आणि काळा कोट घातलेल्या शाहरुखने शेवटी असलेल्या ‘एच-ए१’ या डब्यात प्रवेश केला आणि ५.४८ वाजता गाडी सुटली. डब्याच्या खिडकीच्या काचेला हात टेकवून शाहरूख चाहत्यांना निरोप देत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video raees dhingana song bootlegger shah rukh khan rules farzi world in style

ताज्या बातम्या