दोन भिन्न संस्कृतींचा मिलाफ दाखवणारी ‘काहे दिया परदेस’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेद्वारे ऋषी सक्सेना आणि सायली संजीव ही नवीन जोडी प्रेक्षकांसमोर आली.
मालिकेत वाराणसीचा शिव (ऋषी) आणि मुंबईची गौरी (सायली) या दोघांची मने आता हळूहळू जुळू लागली आहेत. भिन्न जीवनशैली, विचारसरणी असलेल्या या दोन व्यक्ती आता एकमेकांच्या जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता ही मालिका वेगाने पुढे सरकते आहे, असं म्हणायला हरकत नाही. शिव त्याच्या मनात असलेले प्रेम गौरीसमोर व्यक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. तर गौरीला नक्की आपल्या मनात शिवबद्दल काय भावना आहेत ते समजून घेण्यासाठी वेळ लागतोय. मात्र, शिवने त्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत. आपल्या सुमधूर आवाजात गाणे म्हणत शिवने गौरीला कसे प्रपोज केले ते या व्हिडिओत पाहूया….