डिटेक्टिव विद्या.. अहो, गोंधळू नका. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने काही खरोखर डिटेक्टीवगिरी सुरु केलेली नाही. ख-या जीवनात तर नाही पण चित्रपटात ती जासूसी करणार आहे. ‘बॉबी जासूस’ या चित्रपटात विद्या डिटेक्टिवच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘बॉबी जासूस’ या चित्रपटाची निर्मिती दिया मिर्झा आणि साहिल सांघा यांच्या बॉर्न फ्री एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात येणार आहे. तर, चित्रपटाची कथा संयुक्ता चावलाची असून, समर शेख याचे दिग्दर्श करणार आहे.
विद्याप्रमाणेच ‘जग्गा जासूस’मध्ये रणबीर कपूर आणि ‘ब्योमकेश बक्शी’मध्ये सुशांत सिंग राजपूत डिटेक्टीवच्या भूमिकेत झळकणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2013 रोजी प्रकाशित
विद्या बालन करणार जासूसी
डिटेक्टिव विद्या.. अहो, गोंधळू नका. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने काही खरोखर डिटेक्टीवगिरी सुरु केलेली नाही.

First published on: 23-09-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan to play detective in bobby jasoos