तेलुगूमधील आघाडीचा अभिनेता विजय देवरकोंडा हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. जगभरात विजयचे लाखो चाहते आहेत. अखेरचा ‘खुशी’ चित्रपटात झळकलेला विजय त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. विजयला त्याच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयने पहिल्या पुरस्काराचा लिलाव केला होता, असा खुलासा केला आहे.

अभिनयासाठी मिळालेल्या पहिल्या फिल्मफेअर पुरस्काराचा त्याने लिलाव केला होता, असं विजय देवरकोंडाने सांगितलं. त्याने हे पैसे दान केले होते आणि ती आयुष्यातील एक चांगली आठवण आहे, असंही तो म्हणाला. “मला प्रमाणपत्रं आणि पुरस्कारांमध्ये फारसा रस नाही. काही पुरस्कार माझ्या ऑफिसमध्ये असतील तर काही माझ्या आईने कुठेतरी ठेवले असतील. मी काही पुरस्कार दुसऱ्यांना दिले. त्यातला एक पुरस्कार मी संदीप रेड्डी वांगा यांना दिला होता,” असं गॅलाटा प्लसला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाला.

article about seed bank in shirol taluka
देशी बीज बँक!
Pune, Vivek Wagh, theater actor, producer, director, National Award, documentary, Jakkal, Joshi-Abhyankar murder case, Checkmate, pune news,
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन
nashik zilla parishad marathi news
नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव
Book Giller in Canad Worldwide Novel
पुरस्काराआधीच पुस्तकवापसी…
ICC Player of the Month Award for June 2024
बुमराह-स्मृतीने रचला इतिहास, पहिल्यांदाच एका देशाच्या दोन खेळाडूंनी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारावर कोरले नाव
Lal Krishna Advani
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, आठवड्याभरात दुसऱ्यांदा प्रकृती खालावली
Arundhati Roy Pen Pinter Prize
प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना ‘पेन पिंटर पुरस्कार २०२४’ जाहीर
kolhapur annalal surana
वाढत्या अपप्रवृत्ती, हिंसाचाराविरोधात आवाज उठवा; अन्नालाल सुराणा यांचे आवाहन, शाहू पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या

विजय म्हणाला, “मला मिळालेल्या फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पहिल्या पुरस्काराचा मी लिलाव केला होता, त्यातून आम्हाला चांगले पैसे मिळाले होते. मला वाटतं दगडाचा तुकडा घरात ठेवण्यापेक्षा ही माझ्यासाठी चांगली आठवण आहे.” विजयने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हे पैसे दान केले होते. विजयने नुकतीच दिलेली मुलाखत चर्चेत आहे. यामध्ये त्याने लग्न करून बाबा व्हायचं आहे, असं म्हटलं होतं. विजय रश्मिका मंदानाला डेट करत असल्याची चर्चा आहे, पण दोघांनीही याबाबत कधीच अधिकृत माहिती दिलेली नाही.

विजय देवरकोंडाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच तो ‘फॅमिली स्टार’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात विजयबरोबर अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे.