Vijay Deverakonda Ed investigation : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दक्षिणेतील २९ प्रसिद्ध कलाकारांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचाही सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

कलाकारांवर ही कारवाई सट्टेबाजीशी संबंधित एका मनी लाँडरिंग प्रकरणात झाली आहे. या प्रकरणात बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून गैरप्रकारे पैसा कमावला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या कलाकारांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार आहे. माध्यमांनुसार, अभिनेता विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज, निधी अग्रवाल, परिनिता सुभाष, मंचू लक्ष्मी यांच्यासह दोन टीव्ही कलाकारांचाही या यादीत समावेश आहे.

मोठ्या पडद्यावरील कलाकार, टेलिव्हिजनवरील कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्यावर संशयास्पद कृती आढळल्यास (ED) कडून कायदेशीर कारवाई होणार आहे. या प्रकरणावर विजय देवरकोंडाने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मी A23 या गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी केवळ ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम केलं होतं.”

विजय देवरकोंडाच्या टीमने सांगितलं की, “सर्वोच्च न्यायालयाने या गेमिंग अ‍ॅपला ‘कौशल्यावर आधारित’ असल्याचं मान्य केलं आहे”. यासह राणा दग्गुबतीनेही प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “माझा त्या गेमिंग अ‍ॅपसोबतचा करार २०१७ मध्येच संपला होता. तो कायदेशीर होता आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता होती.” प्रकाश राज यांनीही सांगितलं की, “मी जंगली रमी या अ‍ॅपसोबत २०१६ मध्ये करार केला होता, पण तो एक वर्षातच संपवला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विजय देवरकोंडाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच ‘किंग्डम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता यामधून एका वेगळ्या भूमिकेतून झळकणार आहे. विजय देवरकोंडाचा हा चित्रपट ३१ जुलैला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. विजय देवरकोंडासह ‘किंग्डम’मध्ये अभिनेत्री भाग्यश्री बोरसे झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. आता लवकरच त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.