‘ब्रह्मास्त्र’, ‘चूप’ बॉक्स ऑफिस चांगली कमाई करताना दिसून येत आहेत. बिग बजेट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने तर ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता चर्चा सुरु झाली आहे ती हृतिक रोशन, सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाची. हे दोघे स्टार पहिल्यांदाच या चित्रपटात काम एकत्र काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर बघितल्यापासून चाहते चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन यातील कलाकार करताना दिसून येत आहेत.

हा चित्रपट मूळ तामिळ रिमेक आहे. मूळ चित्रपटात विजय सेतूपती, आर माधवन हे कलाकार होते. विजय सेतुपतीने साकारलेली भूमिका हृतिक रोशन साकारत आहे. विजय सेतूपती हा तामिळ चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हिंदीत डब केले जातात. त्याने या चित्रपटात केलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. एका पत्रकाराने ह्रतिकला प्रश्न विचाराला, ‘मूळ चित्रपटात विजय सेतूपती यांनी उत्तम काम केलं आहे .तुझ्यावर किती या भूमिकेची जबाबदारी होती अभिनेता म्हणून’? हृतिक म्हणाला ‘मला घाबरवत आहात का? माझ्या भूमिकेसाठी माझी सर्वात मोठी जबाबदारी होती ती म्हणजे माझ्या दिग्दर्शकाच्या मनात जशी भूमिका आहे तशीच पडद्यावर साकारणं, चित्रपटाच्या सेटवरदेखील मी कायम एखादा सीन चित्रित झाल्यानंतर दिग्दर्शकाने जरी ओके म्हंटल तरी त्यांच्या डोळ्यात बघायचो मी चांगलं सीन दिला आहे की नाही ते, मी चित्रपट असेच करतो जिथे मला दिग्दर्शकाकडून शिकता येईल’.

या चित्रपटातून हृतिक सैफ धमाकेदार ऍक्शन करताना दिसून येणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येदेखील हृतिक भाव खाऊन गेला आहे. की ब्रह्मास्त्र २ मध्ये हृतिक दिसणार का?सध्या अशी ही चर्चा आहे, त्यावर पीटीआयशी संवाद साधताना हृतिक म्हणाला, “खरं सांगायचं झालं तर असं काहीच घडत नाहीये, आता मी माझ्या ‘फायटर’ या चित्रपटाच्या तयारीसाठी वेळ काढणार आहे, आणि त्यानंतरच इतर चित्रपटांवर (तुम्ही विचारलेल्या प्रोजेक्टबद्दल) मी विचार करेन, त्यासाठी मी खूप आशावादी आहे.”

ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी मानधन न घेणाऱ्या रणबीरचा पहिला पगार किती होता माहितीये का?

दरम्यान हृतिक सैफचा विक्रम वेधा हा ३० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगदेखील सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.