काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित ‘विशू’ या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर ‘विशू’ म्हणतो, “यहा दिल में…” या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण ‘विशू’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला ‘विशू’ पाहिल्यावर घडणार आहे.

‘विशू’चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे कठीण होते. या बेटावर मोबाईलचे नेटवर्क नव्हते, त्यामुळे इतरांशी संपर्कात राहणे खूप कठीण होते. त्यात चित्रीकरण बेटावर आणि बाहेर कलाकरांच्या राहण्याची सोय त्यामुळे बोटीने ये-जा करावी लागत होती. तांत्रिकदृष्ट्याही हे कठीण जात होते. तरीही या सगळ्यावर मात करत ‘विशू’चे चित्रीकरण पूर्ण झाले.

‘जर्सी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला शाहिद कपूरने व्यक्त केली मनातील ‘ती’ इच्छा; म्हणाला, “मला अल्लू अर्जुन…”

श्री कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. हृषिकेश कोळी यांनी विशू’चे संवाद, पटकथा केले असून या चित्रपटाला हृषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे. तर मंगेश कांगणे यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. ‘विशू’चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे.या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरुबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर हे प्रमुखेत दिसणार आहे.