बॉलीवूडचा दंबग खान सलमानच्या आगामी बजरंगी भाईजान चित्रपटातील सेल्फी लेले रे.. हे पहिले गाणे प्रदर्शित झाले असून यूट्युबवर गाण्याला चांगली पसंती देखील मिळत आहे. तरुणाईमध्ये असलेल्या सेल्फीची क्रेझ लक्षात घेऊन गाण्याचे बोल लिहीण्यात आले आहेत. सेल्फी लेले रे म्हणत गुलालाची उधळण करत सलमान रस्त्यावर आपल्या मनमोकळ्या नृत्यशैलीत थिरकताना दिसतो. हनुमानाची वेशभुषा परिधान केलेली बच्चेमंडळी देखील गाण्यात सलमानसोबत सेल्फी टीपताना दिसतात. सलमानच्या इतर गाण्यांप्रमाणेच याही गाण्यात संपूर्ण नृत्यात एखादी लक्षवेधी डान्सिंग स्टेपचा तडाका देण्यात आला आहे. संगीतकार प्रीतम यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून गायक विशाल दादलानी याने गायले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2015 रोजी प्रकाशित
‘सेल्फी लेले रे..’ सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’मधील पहिले गाणे प्रदर्शित
बॉलीवूडचा दंबग खान सलमानच्या आगामी बजरंगी भाईजान चित्रपटातील सेल्फी लेले रे.. हे पहिले गाणे प्रदर्शित झाले असून यूट्युबवर गाण्याला चांगली पसंती देखील मिळत आहे.

First published on: 04-06-2015 at 06:18 IST
TOPICSबजरंगी भाईजान
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch bajrangi bhaijaan first song