रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या आगामी ‘राम लीला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. संजय लीला भन्सालीच्या या चित्रपटासाठी एकत्र आलेल्या या जोडीमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये चालू आहे.
भन्सालीच्या ‘हम दिल दे चुके’ चित्रपटाप्रमाणेच राम लीलाचे चित्रीकरणदेखील गुजरातमध्येच करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेला गरबा ‘ढोली तारो’ गाण्याची आठवण करुन देते. ट्रेलर पाहता रणवीरने खूप चांगल्या पद्धतीने गुजराती भाषा आत्मसात केलेली दिसते. तर, ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये मद्रासी मुलीची भूमिका करणारी दीपिका तिच्या गुजराती छोकरीच्या अंदाजाने आश्चर्याचा धक्का देते. चित्रपटात रिचा चड्डा, सुप्रिया पाठक, गुलशन देवैया, अभिमन्यू शेखरसिंग, श्वेता सालवे, बरखा बिश्त सेनगुप्ता आणि शरद केलकर यांच्याही भूमिका आहेत.

शेक्सपियरच्या रोमॅण्टिक ‘रोमिओ आणि ज्युलिएट’ची देसी झलक असलेला ‘राम लीला’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.