एकता कपूरच्या २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘रागिनी एमएमएस’चा सिक्वल तयार करण्यात आला आहे. नुकताच ‘रागिनी एमएमएस २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅडल्ट चित्रपटात काम करणारी सनी लिओनीची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला पहिल्या चित्रपटाची झलक पाहण्यास मिळते. ‘रागिनी एमएमएस २’ हा पहिल्या चित्रपटाच्या पूर्वार्धावर आधारित असून तो ‘मर्डर’ किंवा ‘राज’ चित्रपटांच्या सिक्वलप्रमाणे नसल्याचे म्हटले जात आहे. भूषण पटेल दिग्दर्शित आणि एकता कपूरची निर्मिती असलेला हा चित्रपट जानेवारी २०१४ला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2013 रोजी प्रकाशित
पहाः सनी लिओनीच्या ‘रागिनी एमएमएस २’चा ट्रेलर
'रागिनी एमएमएस २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

First published on: 13-09-2013 at 04:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch sunny leones scary act in ragini mms