हॉरर चित्रपट बनविण्यात निष्णातअसलेला दिग्दर्शक विक्रम भट्ट यांने त्याच्या आगामी ‘हॉरर स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
चित्रपटाची कथा सात मित्रमैत्रीणींवर आधारित असून हे सगळेजण फेअरवेल पार्टी करण्याकरिता झपाटलेल्या ग्रॅन्डॉइज हॉटेलमध्ये जातात. कही कारणास्तव जळालेल्या वेड्यांच्या इस्पितळाच्या जागेवर हे हॉटेल बांधलेले असते. तसेच, हॉटेलचा मालक दिवाळखोर झाल्यामुळे हॉटेलच्या छतावरून आत्महत्या करतो. त्यामुळे या झपाटलेल्या हॉटेलवर फेअरवेल पार्टी करण्यासाठी आलेल्या या सात मित्रांची ही शेवटची रात्र ठरते, यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.
आयुष रैनाने ‘हॉरर स्टोरी’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात टीव्ही कलाकार करण कुंद्रा असून तो या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच, रविश देसाई, हसन झैदी, निशांत मल्कानी, शीतल सिंग, अपर्णा बाजपेयी, राधिका मेनन आणि नंदिनी वैद हे नवे चेहरे पाहण्यास मिळणार आहेत. ‘हॉरर स्टोरी’ चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2013 रोजी प्रकाशित
पाहाः विक्रम भट्टच्या ‘हॉरर स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर
हॉरर चित्रपट बनविण्यात निष्णात असलेला दिग्दर्शक विक्रम भट्ट यांने त्याच्या आगामी 'हॉरर स्टोरी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
First published on: 22-08-2013 at 05:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch the trailer of vikram bhatts horror story