मनिष मल्होत्राची भाची रिद्धीने सोमवारी तेजस तळवलकरसह विवाह केला. हा विवासोहळा संपन्न होण्यापूर्वी संगीत आणि मेहंदी सोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
यावेळी, बॉलीवूड दिवा करिना कपूरनेही ठुमके लावले. सदर व्हिडिओत डिझायनर मनिष मल्होत्रा, करण जोहर आणि करिना हे मिका सिंगच्या गाण्यावर नाचताना दिसतात. विशेष म्हणजे मिका सिंगने ‘जब वी मेट’मधील ‘मौजा ही मौजा’ हे गाणे गायले. त्यामुळे करिना ही थोडी हडबडली. पण तीने ही वेळ कशीबशी सावरून घेतली. या चित्रपटात करिनाने तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर शाहिद कपूरसह काम केले होते. त्यामुळे मिकाने गाण्यास सुरुवात करताच तिला अवघडल्यासारखे झाले. मात्र, करण जोहर आणि मनिष मल्होत्रा हे दोघेही गाण्यावर जोरदार थिरकले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2014 रोजी प्रकाशित
पाहाः करण जोहर, मनिष मल्होत्रासह करिनाचे ठुमके
मनिष मल्होत्राची भाची रिद्धीने सोमवारी तेजस तळवलकरसह विवाह केला.

First published on: 16-12-2014 at 02:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch when kareena kapoor danced with karan johar at manish malhotras nieces sangeet