ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज यांच्या साखरपुड्याची सध्या चर्चा सुरू आहे. या दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. पण, आता बिपाशा आणि रोनाल्डो यांच्याबद्दलही बोललं जातं आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री बिपाशा बासूचा एक जुना फोटो पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला किस करताना दिसत आहे. हा फोटो २००७ सालचा आहे. हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल जगतातील मोठे नाव आहे. फुटबॉलमुळे जेवढी चर्चा रोनाल्डोची होते, तेवढीच चर्चा त्याच्या अफेअर्सबद्दलही होते. बिपाशा आणि ख्रिस्तियानो यांचा किस करतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ते दोघे डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.

२००७ मध्ये रोनाल्डो आणि बिपाशा बासू यांच्यातील किसिंग कॉन्ट्रोव्हर्सी पुन्हा चर्चेत आली आहे, कारण त्यावेळी बिपाशा जॉन अब्राहमबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. लिस्बन, पोर्तुगाल इथं ‘न्यू सेवन वंडर्स ऑफ द वर्ल्ड’ कार्यक्रमात रोनाल्डो आणि बिपाशाची भेट झाली होती. त्यानंतर दोघांना एका पार्टीत एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच पार्टीत बिपाशाने रोनाल्डोला किस केलं होतं. आता रोनाल्डोच्या साखरपुड्यानंतर पुन्हा एकदा या दोघांची चर्चा सुरू आहे.

या कार्यक्रमात बिपाशा बासू बॉलीवूडचे प्रतिनिधित्व करत होती, तर रोनाल्डो एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार होता. कार्यक्रमानंतर बिपाशा आणि रोनाल्डो एका पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीमधील काही फोटोंमध्ये ते हसताना आणि बोलताना दिसले, पण बिपाशाने रोनाल्डोला किस केल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

जॉन अब्राहमबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना बिपाशाने रोनाल्डोला किस केल्यामुळे तिच्यावर जोरदार टीका झाली होती. या सगळ्यानंतर बिपाशानं अनेक वर्षांनी ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं होतं.

अभिनेत्री म्हणाली होती की, ‘मी कधीही मीडियाला त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला नाही, पण आता देईन. रोनाल्डोची मी खूप मोठी फॅन होते आणि आहे. मी पोर्तुगालमध्ये ‘सेव्हन वंडर्स ऑफ द वर्ल्ड’ होस्ट करत होते. त्यानंतर एका पार्टीत मी त्याला भेटले. तो खूप उंच आहे आणि खूप आवाज असल्यामुळे त्याला बोलायला प्रत्येक वेळी खाली वाकावे लागत होते. तो खाली वाकून माझ्याशी बोलत होता.’ बिपाशाने एका मुलाखतीत असंही सांगितलं होत की, रोनाल्डोला भेटणे हे एक मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे.

रोनाल्डो आणि बिपाशा यांची ओळख झाली, तेव्हा बिपाशा ही जॉनला डेट करत होती. बॉलीवूड वेडिंगच्या रिपोर्टनुसार, रोनाल्डो आणि बिपाशा इतके जवळ आले होते की त्याचा जॉनबरोबरच्या नातेसंबंधावर परिणाम झाला होता. बिपाशाने ‘अजनबी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. बिपाशाने जॉन अब्राहमबरोबर ‘जिस्म’ या चित्रपटात काम केलं होतं आणि याच काळात ते दोघे प्रेमात पडले होते. बिपाशा आणि जॉन सीरियस रिलेशनशिपमध्ये होते, परंतु ते दोघे २०११ मध्ये वेगळे झाले. दरम्यान, बिपाशाने करण ग्रोव्हरशी लग्न केलं आणि आता दोघांना एक मुलगी आहे.