चित्रपटसृष्टीमधून अनेकदा आपल्याला वेगवेगळे किस्से ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा १९९७ च्या एका हिट सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलरच्या शूटिंगचा आहे. चित्रपटाचा मुख्य नायक त्याच्या सह-कलाकाराबद्दल तक्रार करण्यासाठी दिग्दर्शकाकडे गेला होता.

या सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलरमध्ये बॉबी देओलबरोबर काजोल आणि मनीषा कोईराला यांच्याही भूमिका होत्या.या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉबी देओलने इंडस्ट्रीतल्या टॉप अभिनेत्रीच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार दिग्दर्शकाकडे केली होती. चित्रपटातील एक रोमँटिक सीन शूट करण्यापूर्वी तो अभिनेत्रीच्या जवळ जाताच, तिच्या तोंडाचा वास अभिनेत्याला इतका त्रास देत होता की नायक सेटवर सर्वांसमोर म्हणाला होता, ‘तिच्या तोंडातून दुर्गंधी येत आहे.’

हा किस्सा बॉबी देओलचा आहे, जो बॉलीवूडच्या हिरोपासून खलनायक बनला आणि चर्चेत आला. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातून कमबॅक केल्यापासून अभिनेता बॉबी देओल मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याला बॅक टू बॅक चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत.

१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्याने ‘गुप्त’ आणि ‘सोल्जर’सारखे सदाबहार चित्रपट दिले. त्याने प्रीती झिंटापासून काजोलपर्यंत सर्वांबरोबर काम केले, पण तुम्हाला तो किस्सा माहीत आहे का, जेव्हा त्याला एका हिट चित्रपटासाठी एक रोमँटिक सीन शूट करायचा होता आणि अभिनेत्रीबरोबरचा सीन सुरू होताच त्याचे मन सुन्न झाले. त्याने स्वतः हा किस्सा सांगितला होता.

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉबी देओलने अभिनेत्रीच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार दिग्दर्शकाकडे केली होती. ती अभिनेत्री इंडस्ट्रीत नवखी नव्हती. त्या वेळी ती आघाडीची अभिनेत्री होती. बॉबी देओलने २००१ मध्ये फिल्मफेअरशी बोलताना या गमतीशीर गोष्टीचा खुलासा केला होता. गुप्त चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनीषा कोईरालाच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार त्याने केली होती.

बॉबीने सांगितलं होतं की, ‘बेचैनियाँ’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्याचा आणि मनीषाचा एक शॉट होता, त्यामध्ये बॉबीला मनीषाच्या हनुवटीवर चावायचे होते. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्याला मनीषाच्या जवळ जावं लागणार होतं; पण मनीषाच्या तोंडातून कांद्याचा उग्र वास येत असल्याने त्याला तिच्या जवळ जाऊन सीन करणं कठीण जात होतं. खरंतर, मनीषाने शूटिंगच्या अगदी आधी कच्च्या कांद्याबरोबर चणा चाट खाल्ला होता, त्यामुळे तिला हा रोमँटिक सीन शूट करणे खूप कठीण झाले. बॉबी म्हणाला की, मी तो सीन करू शकलो हा एक चमत्कार होता. नंतर मी दिग्दर्शकालाही त्याबद्दल सर्व काही सांगितले.१९९७ मध्ये बॉबी देओल ‘गुप्त’ मध्ये दिसला. हा त्याचा दुसरा चित्रपट होता आणि त्याचे कलेक्शन १८.२३ कोटी रुपये होते.