आमिरच्या दंगल सिनेमातल्या मुली म्हणजे फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी भले ही आमिर खानसोबत काम केले असेल पण त्यांना आजही शाहरुख खानच फार आवडतो. दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात तशी त्यांनी कबुलीही दिली होती.
फातिमा सना शेखने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शाहरुखसोबत घडलेला एक किस्सा सांगितला. तिने सांगितले की, त्या दोघींनी शाहरुखला अगदी घाबरत स्पर्श केला होता. कारण त्या दोघीही शाहरुखच्या फार मोठ्या चाहत्या आहेत. त्यामुळेच जेव्हा त्या शाहरुखसोबत उभ्या होत्या तेव्हा शाहरुखला स्पर्श केल्याशिवाय त्या स्वतःला रोखू शकत नव्हत्या.
https://www.instagram.com/p/BPPsT5BFEB4/
फातिमाने पुढे सांगितले की, दिवाळी पार्टीच्या दरम्यान जेव्हा आमिर शाहरुखला दंगलचे काही व्हिडिओ दाखवत होते तेव्हा मस्करीच्या वातावरणात त्यांनी मुद्दाम शाहरुखला स्पर्श केला. त्यांना माहित होते की ही अगदीच ‘फॅनगिरी’ आहे पण तरीही त्यांनी असे केले.
दरम्यान, बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ सिनेमाने विक्रमी कमाई केली आहे. गतवर्षीच्या सरशेवटी २३ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर कमाईची दंगल अद्यापही सुरुच आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाईचा विक्रम तर केलाच आहे. पण भारतामध्ये धमाकेदार कमाई केल्यानंतर हा सिनेमा परदेशातदेखील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.
https://www.instagram.com/p/BPPrbA7FZfS/
एकंदरीत देशभरातच नव्हे तर जगभरात दंगल आणि आमिरसह फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी देखील वाहवाह मिळवली. बहुचर्चित चित्रपटावर चौहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले. ‘दंगल’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी आमिरने पिळदार शरीरयष्टीसाठी केलेल्या मेहनतीचे देखील कौतुक झाले होते. याच वेळी महावीर सिंग फोगट साकारत असताना आमिरने दोन रुपातील व्हिडिओची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.