आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

राजू श्रीवास्तव यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. त्यांच्या कारकिर्दीतदेखील त्यांना देखील त्यांना संघर्ष करावा लागला होता. मुळचे कानपूर असलेले राजू श्रीवास्तव आपली कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले होते. सुरवातीला त्यांना काम मिळाले नाही म्हणून त्यांनी पोट भरण्यासाठी रिक्षा देखील चालवली. त्यांनी हळूहळू विनोदी कार्यक्रम करून आपली ओळख बनवली. अशाच एक कार्यक्रमात त्यांच्या चाहत्याने त्यांचे जॅकेट चोरले होते.

राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबीय करताहेत सलग दोन दिवस पूजा, नवी माहिती समोर

राजू श्रीवास्तव यांनी मुलाखतीत किस्सा सांगितला आहे, ते असं म्हणाले की, मी प्रयागराज येथे एक कार्यक्रम करण्यासाठी गेलो होतो. कार्यक्रमाला सुरवात होण्याच्या आधी मी तयारी करत होतो. कार्यक्रम खुल्या मैदानावर होता. मी बॅकस्टेजला होतो, रंगमंचावर प्रवेश करणार तितक्यात एक माणूस मला हाक मारत होता. ‘मला ओळखलंत का’? असं तो मला विचारत होता. अखेर मी त्याला पोलिसांच्या मदतीने जवळ बोलवले, तेव्हा तो म्हणाला, ‘मला ओळखलं नाहीत का’? १० वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही इथेच कार्यक्रम करण्यासाठी आला होतात, तेव्हा तुमचे हे जॅकेट मी चोरले होते. ते आज परत करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजू श्रीवास्तव प्रयागराज येथे कार्यक्रम करण्यासाठी गेले असताना त्यांच्या चाहत्याने त्यांचे जॅकेट चोरले होते मात्र चाहते शेवटी कलाकाराच्या प्रेमासाठी अशी कृत्य करतात. तब्बल १० वर्षांनी त्यांच्या चाहत्याने जॅकेट त्यांना परत केले. आपल्या विनोदी स्वभावाने सगळ्यांना हसवणारे राजू श्रीवास्तव सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते लवकर व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.