बॉलीवूडमधील मोस्ट आयकॉनिक कपल म्हणून आजही अभिनेत्री नीतू कपूर आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याकडे पाहिलं जातं.

नीतू कपूर आणि ऋषी कपूर लग्नापूर्वी मित्र होते. दोघांचेही प्रेमविवाह झाले होते. लग्नानंतर नीतूंनी अभिनय कारकीर्द सोडून कुटुंबावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. पण, लग्नानंतरही त्या ऋषी यांच्या फ्लर्टिंगबद्दल खूप नाराज होत्या.

‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून ऋषी कपूर यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. लग्नानंतरही ते अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसले.

‘बॉबी’ चित्रपटामुळे ऋषी कपूर खूप प्रसिद्ध झाले. या चित्रपटानंतर ऋषी प्रत्येक मुलीच्या स्वप्नांचा राजकुमार बनले. मुली त्यांच्याबाबत इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्या त्यांना प्रेमपत्रे लिहायच्या. या चित्रपटात डिंपल कपाडियाबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण, जेव्हा त्यांनी पुन्हा डिंपलबरोबर एक रोमँटिक सीन शूट केला तेव्हा त्यांना पाहून नीतू संतापल्या होत्या.

ऋषी यांनी एकदा खुलासा केला होता की, ‘आमच्या लग्नानंतर अनेक वर्षांनी नीतू मला म्हणाली की, जेव्हा मी डिंपलबरोबर ‘सागर’मध्ये काम केले तेव्हा तिला फक्त एकदाच धोका जाणवला होता. एवढेच नाही तर ऋषी कपूर यांच्या पुस्तकात त्यांनी डिंपलबरोबरच्या त्यांच्या अफेअरबद्दलही संकेत दिले होते. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी ‘सागर’ चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांना एकत्र कास्ट करण्यात आले होते, त्या घटनेचाही उल्लेख केला आणि नीतू यामुळे खूप नाराज झाल्या होत्या.

या चित्रपटात दोघांनीही अनेक रोमँटिक सीन शूट केले होते. प्रीमियरमध्ये नीतू यांना दिसले की दोघांमध्ये एक किसिंग सीन आहे, जे ऋषी यांनी नीतू यांना न सांगताच शूट केला होता. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा हा सीन पाहिला तेव्हा त्यांना राग आला. त्यांनी ऋषीला सांगितले होते की ती (डिंपल) जास्तच चिकटून बसत आहे. ऋषी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘तिला काळजी करण्याची गरज नव्हती, डिंपल माझी मैत्रीण होती, जरी ती ‘बॉबी’च्या काळात थोडी जास्तच होती, दहा वर्षे उलटून गेली होती, ती तिच्या दोन मुलांसह लग्नातून बाहेर पडत होती आणि मीही दोन मुलांसह माझा संसार करत होतो. पण, आम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रित करत होतो.

ऋषी कपूर यांचे एप्रिल २०२० मध्ये निधन झाले. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचे लग्न जानेवारी १९८० मध्ये झाले होते. एका चित्रपटादरम्यान दोघांचेही प्रेम झाले. नीतू कपूर आणि पती ऋषी कपूर यांची जोडी ऑनस्क्रीनही तेवढीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायची.