बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी देखील ती नेहमीच चर्चेत असते. ट्विंकल ही दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची मोठी मुलगी आहे. त्या दोघांचे नाते हे फक्त वडिल आणि मुलीचे नव्हते तर मित्र-मैत्रिणीसारखे होते. ट्विंकलने तर वडील राजेश खन्ना यांच्यासोबतच पहिल्यांदा मद्यपान केले होते. एवढचं नाही तर त्यांनी ४ बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला दिला होता, असे स्वत: ट्विंकल म्हणाली होती.

२०१९ मध्ये ‘फादर्स डे’ निमित्ताने ट्विंकलने वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने हा किस्सा सांगितला होता. त्यांनी तिला रिलेशनशिप विषयी अनेक सल्ले दिले होते. “राजेश खन्ना यांनी तिला विचारले की तुझा बॉयफ्रेंड नाही का? पुढे बोलताना ते म्हणाले नेहमी लक्षात ठेव एका वेळी ४ बॉयफ्रेंड ठेव, यामुळे तुझे हृदय तुटण्याची शक्यता कमी असेल,” असे ट्विंकल म्हणाली होती.

आणखी वाचा : ‘खायला पैसे नव्हते, अक्षरश: बिग बींनी घरात काम करणाऱ्यांकडून पैसे…’, अभिषेकने केला खुलासा

आणखी वाचा : कॅट-विकीनंतर श्रद्धाचा नंबर? मावशी पद्मीनी कोल्हापूरेने दिले लग्नाचे संकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ट्विंकल म्हणाली की, “त्यांनी मला नेहमीच समान वागणूक दिली. एवढचं नाही तर तेच होते ज्यांनी मला पहिल्यांदा मद्यप्राशन करण्यास शिकवले होते. त्यांनी स्कॉचने भरलेला ग्लास माझ्या हातात दिला होता.”