‘खायला पैसे नव्हते, अक्षरश: बिग बींनी घरात काम करणाऱ्यांकडून पैसे…’, अभिषेकने केला खुलासा

अभिषेकने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

amitabh bachchan, abhishek bachchan,
अभिषेकने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. (Photo Credit: Abhishek Bachchan Instagram)

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे आज सगळं काही आहे. पण त्यांच्यावर अशी वेळ देखील आली होती, जेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. हा तो काळ होता जेव्हा अमिताभ यांच्यावर आर्थिक संकट आलं होतं. याचा खुलासा अमिताभ यांचा मुलगा आणि अभिनेता अमिताभ बच्चनने एका मुलाखतीत केला आहे.

अभिषेकने ‘द रणवीर शो’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकने त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकाटा विषयी सांगितले. अमिताभ यांनी त्यांच्याइथे काम करणाऱ्या लोकांकडून उधारीवर पैसे घेतले होते जेणे करून त्यांच्या कुटुंबाला जेवण मिळेल. “कुटुंबाच्या आजुबाजुला रहायला मला आवडतं. माझ्या वडिलांना रात्रीचे जेवण कसे मिळेल हे माहित नसताना, मी बोस्टनमध्ये राहू शकत नव्हतो. माझ्या वडिलांना आमच्या इथे कामाला असणाऱ्या लोकांकडून पैसे उधारीवर घ्यावे लागत होते, जेणे करून ते आम्हाला जेवण देऊ शकतील. त्यामुळे बोस्टनमध्ये न राहता त्यांच्या जवळ राहण्याची गरज आहे असे मला वाटले,” असे अभिषेक म्हणाला.

पुढे अभिषेक म्हणाला, त्याने अमिताभ यांना फोन केला आणि कॉलेज सोडून त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा सांगितली. हे ऐकल्यानंतर अमिताभ भावूक झाले होते. त्याआधीच अभिषेकने अमिताभ यांना त्याला अभिनेता होण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अभिषेक भारतात परतला.

नुकतेच केबीसीचे १ हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. त्यावेळी अमिताभ हे भावूक झाले आणि त्यांनी केबीसीची ऑफर कशी स्विकारली ते सांगितले होते. केबीसीची ऑफस जेव्हा त्यांना मिळाली होती तेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट आले होते. त्यांना चित्रपटसृष्टीत काम मिळत नव्हते. या कारणामुळे त्यांनी केबीसी करण्यासाठी होकार दिला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan had to borrow money from staff to put food on the table reveals abhishek bachchan dcp

ताज्या बातम्या