अभिनेत्री हंसिका मोटवानीने बुधवारी फोटो शेअर करत तिचं सोहेल खातुरियाबरोबरचं रिलेशनशिप अधिकृत केलंय. सोहेलने पॅरिसच्या आयफिल टॉवरसमोर तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. गेले काही दिवस हंसिकाच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या, अशातच तिने एंगेजमेंटचे फोटो शेअर केल्याने दोघेही डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकतील, असं म्हटलं जातंय. दरम्यान, हंसिकाचा होणारा पती सोहेल खातुरिया कोण आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

माध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार, सोहेल हा मुबईचा असून तो उद्योजक आहे. हंसिका आणि सोहेल खातुरिया अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि चांगले मित्र आहेत. ते दोघेही बिझनेस पार्टनर आहेत. त्यांनी एकमेकांबरोबर अनेक इव्हेंट केले आहेत. दोघेही एकत्र काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. सोहेल खातुरियाचे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट आहे.

हेही वाचा – …अन् पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडने अभिनेत्रीला केले प्रपोज; फोटो पाहिलेत का?

सोहेलने पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केलं. अगदी चित्रपटातल्या सीनप्रमाणे सोहलने रोमँटिक अंदाजात तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. फोटोंमध्ये सोहेल ब्लॅक सूटमध्ये हँडसम दिसतोय, तर हंसिकाने स्ट्रॅपलेस पांढरा ड्रेस परिधान केला आहे. हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर करत त्याला “Now&Forever” असं कॅप्शन दिलंय. यावर सोहेलने “I love you my life #NowAndForever” अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरुण धवन, अनुष्का शेट्टी, करण टॅकर, पीव्ही सिंधू आणि शिवालिका ओबेरॉय यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचं अभिनंदन केलंय. लवकरच हंसिका आणि सोहेल त्यांच्या लग्नाबद्दल घोषणा करणार असल्याची चर्चा सुरू आहे.