अमेरिका आज जगातील सर्वात यशस्वी देश म्हणून ओळखला जातो. शिक्षण, साहित्य, संशोधन, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांत हा देश इतर देशांच्या तुलनेने अग्रस्थानी आहे. या देशाचा आíथक डोलारा ढासळला की संपूर्ण जगात आíथक मंदीचे वारे वाहू लागतात. यावरूनच जगातील अमेरिकेचे महत्त्व आपल्या ध्यानात येते. अशा या संपन्न देशातील समाज आíथक, सामाजिक आणि सांस्कृतिक या तीनही क्षेत्रात पुढारलेला दिसतो. परंतु ही वरवरची परिस्थिती आहे. हॉलीवूडस्टार ‘विल स्मिथ’ने नुकत्याच एका मुलाखतीतून अमेरिकन व्यवस्थेवर जोरदार टीका केली. पाश्चात्त्य समाजाचे माध्यमातून दिसणारे हे चित्र वरवरचे असून हा देश वर्णद्वेष आणि अंधश्रद्धा यांसारख्या चुकीच्या परंपरांनी ग्रासला आहे. संपूर्ण जगाला आपल्या संगीताच्या तालावर नाचवणारा ‘मायकल जॅक्सन’ ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ‘बराक ओबामा’ अशा जवळजवळ सर्वच महत्त्वकाक्षी लोकांनी वर्णद्वेषाचे चटके सोसले आहेत, असे परखड मत त्याने व्यक्त केले. ‘मेड इन अमेरिका’, ‘मेन इन ब्लॅक’, ‘बॅड बॉइज’, ‘आय अ‍ॅम लेजंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केलेला स्मिथ आज हॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहे. आजवरच्या सिनेकारकीर्दीत अनुभवलेले विविध अनुभव त्याने मुलाखतीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले. सुरुवातीच्या काळात इतर कलाकारांप्रमाणेच त्यालाही संघर्ष करावा लागला. परंतु त्याचा संघर्ष काहीसा वेगळा होता. अनेक निर्मात्यांनी केवळ त्याचा रंग काळा होता म्हणून त्याला काम देण्यास नकार दिला. तसेच कोणी काम दिले तर त्याचे सहकलाकार त्याच्याबरोबर काम करण्यास नकार देत असत. एखाद्या व्यक्तीला यशस्वी  होण्यासाठी केवळ कलागुण असून भागत नाही. तर त्याच्याबरोबर त्याचा रंगदेखील महत्त्वाचा असतो. कला, साहित्य, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत वर्णद्वेष आहे. आणि या वर्णद्वेषामुळेच कृष्णवर्णीयांवर सातत्याने हल्ले होत असतात. त्यांना समाजात कमी लेखले जाते. असे त्याला वाटते. कला सादर करणाऱ्या कलाकाराच्या रंगापेक्षा त्याच्या कलेतून मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे. ही शिकवण अमेरिकेतील तथाकथित पुढारलेल्या समाजाला २१ व्या शतकात द्यावी लागत असल्याची खंत त्याच्या मनात आहे. परंतु जर वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्याहून जास्त चांगल्या प्रवृत्तीचेही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तो आज एक हॉलीवूडस्टार म्हणून वावरत असल्याचे पुढे त्याने नमूद केले.