प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अलिकडेच एका महिला नृत्य दिग्दर्शिकेने त्यांच्यावर अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता आणखी एक महिला त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे सरसावली आहे.

या महिलेने गणेश आचार्य यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. ९०च्या दशकात ही महिला त्यांच्यासोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होती. त्यावेळी गणेश यांनी बळजबरीने तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले होते, अशी तक्रार तिने राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार ३० वर्षांपूर्वी ही महिला बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होती. त्यावेळी एका चित्रपटाच्या निमित्ताने तिची ओळख गणेश आचार्य यांच्याशी झाली. त्यांनी डान्स शिकवण्याच्या निमित्तानं त्यांनी तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भागं पाडलं. असे आरोप तिने केले आहेत. गणेश आचार्य यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते त्यांना बदनाम करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत.