ड्वेन जॉन्सनने घेतला ‘त्या’ दुर्घटनेचा धसका; म्हणाला, “इथून पुढे कधीच…!”

ड्वेन जॉन्सनने चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या ‘या’ घटनेचा धसका घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता अॅलेक बाल्डविनच्या आगामी ‘रस्ट’ या चित्रपटाच्या शूटींगची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या सटेवर शूटींगदरम्यान प्रॉप गनमधून झालेल्या गोळीबारामुळे एक महिला सिनेमॅटोग्राफर हलिनाचा मृत्यू झाला होता. तर यात एक चित्रपट दिग्दर्शक जखमी झाला होता. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर लोकप्रिय हॉलिवूडस्टार ‘द रॉक’म्हणजेच अभिनेता ड्वेन जॉन्सनने चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या या घटनेचा धसका घेतला आहे. अधिक सुरक्षितता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

ड्वेन जॉन्सन हा लवकरच ‘रेड नोटीस’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत रायन रेनॉल्डस आणि गॅल गॅडॉटही पाहायला मिळणार आहे. हा एक अॅक्शन पॅक चित्रपट असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जॉन्सनने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी सिनेमॅटोग्राफर हॅलिना हचिन्सला सेटवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे या पुढे ‘द रॉक’ने चित्रपट निर्मिती सेटवर अधिक सुरक्षितता बाळगण्याबद्दल म्हटले आहे. त्यासोबतच “यापुढे सेव्हन बक्स चित्रपटाच्या सेटवर खऱ्या बंदुकांना परवानगी दिली जाणार नाही. यापुढे चित्रपटात रबर गन्सचा वापर केला जाईल. आम्ही चित्रपट निर्मितीदरम्यानच याची काळजी घेऊ. यासाठी पैशांची कोणतीही चिंता केली जाणार आहे. त्याची किंमत किती याची कोणतीही काळजी करणार नाही,” असे जॉन्सनने सांगितले.

“हॅलिनच्या मृत्यूमुळे मी फार दुखावलो गेलो आहे. तिच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. मी अॅलेकलाही गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर बदुंकावर बंदी घालण्याबद्दल बोललं जात आहे. याबाबत अनेक तर्क विर्तकही समोर येत आहे.”

“मला चित्रपट व्यवसाय आवडतो. चित्रपट व्यवसायात आम्ही नेहमीच सुरक्षा प्रोटोकॉल आणि उपाययोजना केल्या आहेत. सर्व कलाकारांची सुरक्षा आम्ही खूप गांभीर्याने घेतो याचा आम्हाला अभिमान आहे. पण कधी कधी अचानक अशाप्रकारे अपघात घडतात. हा अपघात हृदयद्रावक आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये आपण एकत्र कसे पुढे जाऊ, कसे काम करु, यावर प्रत्येकाने परिक्षण करणे गरजेचे आहे,” असेही जॉन्सन म्हणाला.

ड्वेन जॉन्सन हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अभिनयसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ड्वेनला ‘द रॉक’ म्हणून ओळखले जायचे. तो WWE मधील सुपरस्टार रेसलर होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wont use real guns on set said dwayne johnson after alec baldwin tragedy nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या