आजची पहाट टॉलिवूडकरांसाठी एका धक्कादायक बातमीने सुरू झाली. ‘बिग बॉस’ फेम तमिळ अभिनेत्री याशिका आनंद हिचा चेन्नईमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास कार अपघात झाला आणि यात ती गंभीर जखमी झाली. या अपघातात तिने जवळची मैत्रिण वल्लीचेट्टी भवानी हिला गमावलंय. या भीषण अपघातात याशिकाची मैत्रिण २८ वर्षीय वल्लीचेट्टी भवानी ही कारमध्येच फसली असल्याने तिला बाहेर पडता आली नाही आणि तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झालाय. याचे काही फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत. या फोटोज आणि व्हिडीओवरून अपघात किती भयंकर होता, याचा अंदाज येतो.

तमिळ अभिनेत्री याशिका आपल्या मित्र-मैत्रिणींसह महाबलीपुरमहून चेन्नईला परतत होती. या कारमध्ये एकूण चार जण होते. स्वतः याशिका ही कार चालवत असताना तिचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यावरील डिव्हाडरला धडकली. या अपघातात रस्त्यावरील एका खड्ड्यात जाऊन ही कार कोसळली. रात्री १ च्या सुमारास हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठलं. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासात अभिनेत्री याशिका आनंद विरोधात कलम 279-337-304 नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. सेक्शन 304 नुसार कमीत कमी १० वर्षांची शिक्षा नोंदवण्यात आलीय.

अभिनेत्री याशिका आनंदचा अपघात झाल्याची बातमी ऐकून तिचे फॅन्स चिंतेत पडले आहेत. सोशल मीडियावर तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे वेगवेगळे पोस्ट शेअर केले जात आहेत. सोबतच तिच्या कार अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. याशिका आनंदच्या अपघाताची बातमी पसरताच तिचे वडील दिल्लीहून चेन्नईसाठी निघाले.


याशिकाच्या प्रकृतीसाठी ट्विटरवर तिचे फॅन्स #Yashikaanand या हॅशटॅगने पोस्ट शेअर ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या सोशल मीडियावर #Yashikaanand ट्रेंड करतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री याशिका आनंद हिने इन्स्टाग्राम मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने अनेक तमिळ चित्रपट, वेब सीरिज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. अभिनेत्री याशिका आनंद तमिळनाडुची एक लोकप्रिय मॉडेल आहे. ‘कवलाई वेंदम’, ‘नोटा’ आणि ‘धुरुवंगल पथिनारू’ सारख्या चित्रपटांत तिने काम केलंय. ‘इरुत्तु अरैयिल मुराट्टू कुथु’ मध्ये सुद्धा तिने महत्त्वाची भूमिका साकारलीय.