युवराज सिंगचा साखरपुडा झाला आणि अनेक तरुणींची मने दुखावली गेली. क्रिकेटच्या मैदानातल्या त्याच्या फटकेबाजीचे तर अनेक दिवाने आहेतच शिवाय त्याच्या लुक्स आणि स्टाईलवरही अनेक तरुणी फिदा आहेत. लवकरच तो हेजल कीचसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते दोघे लग्न करणार आहेत. युवराजची आई शबनम सिंग यांनी सांगितले की, युवराजच्या लग्नाच्या तारखेबद्दल अजून काही ठरले नाही. अजून आम्ही कोणती तारीख पक्की करायची यावर चर्चाच करत आहोत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कदाचित युवराजच्या वाढदिवसादिवशीच म्हणजे १२ डिसेंबरला त्याचे लग्न होऊ शकते.
जेव्हा खुद्द युवराजला याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की लग्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. मी लवकरच तुम्हाला लग्नाच्या तारखेबद्दल सांगेन. युवराजच्या कुटुंबाशी जवळीक असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की लग्न पंजाबी पद्धतीने होईल. लग्नानंतर रिसेप्शन असेल. हेजलचे कुटुंब आणि नातेवाईक यूके आणि मॉरिशियसवरुन येणार आहेत. मुंबईत कोणतेही रिसेप्शन होणार नाही अशीही माहिती यावेळी मिळाली.
काही दिवसांपूर्वी हेजल तिच्या आईबरोबर लग्नाची खरेदी करायला जयपुरला गेली होती. युवराजचे डिझायनर मित्र युवराज आणि हेजलचे लग्नाचे पोशाख डिझाइन करणार आहेत. हेजल कीच ही एक ब्रिटीश आणि मॉरीशियन मॉडेल आहे. याशिवाय ती काही बॉलिवूड सिनेमे आणि टिव्ही शोमध्येही दिसली आहे. हेजल २००७ मध्ये आलेला तामिळ सिनेमा बिल्लामध्येही होती. यानंतर २०११ मध्ये सलमान खानच्या बॉडीगार्डमध्येही ती दिसली होती. बिग बॉसच्या सातव्या पर्वातही ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. याशिवाय झलक दिखलाजा आणि कॉमेडी सर्कस यांसारख्या शोमध्येही तिने काम केले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.A photo posted by HazelKeechOfficial (@hazelkeechofficial) on