Yuzvendra Chahal Comments on Dhanashree Verma Alimony : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यावर्षी क्रिकेटमधील कामगिरीबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. युजवेंद्र व धनश्री वर्मा यांचा ४ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर या वर्षी घटस्फोट झाला. युजवेंद्र चहल घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता, त्यावर एक खास मेसेज लिहिला होता. त्याच्या या टी-शर्टची खूप चर्चा झाली होती. कोर्टात तो टी-शर्ट घालून जाण्यामागचं कारण आता युजवेंद्र चहलने सांगितलं आहे.

मार्च २०२५ मध्ये युजवेंद्र चहल व धनश्री वर्माच्या घटस्फोटाची शेवटची सुनावणी झाली. त्यावेळी चहल काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून कोर्टात गेला होता. त्याच्या टी शर्टवर “बी युअर ओन शुगर डॅडी” असं लिहिलं होतं. युजवेंद्रचा हा मेसेज धनश्रीला टोला लगावण्यासाठी होता, असं त्यावेळी म्हटलं गेलं होतं. आता चहलने स्वतःच मेसेज देण्यासाठी तो टी शर्ट घातल्याची कबुली दिली आहे.

टी-शर्टबद्दल युजवेंद्र चहल काय म्हणाला?

राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत टी शर्टबद्दल युजवेंद्र चहल म्हणाला, “मला ड्रामा करायचा नव्हता. पण मला फक्त एक मेसेज द्यायचा होता आणि तो मी टी-शर्ट घालून दिला.” सुरुवातीला कोर्टात असा टी-शर्ट घालून जायचा काहीच विचार नव्हता, पण नंतर धनश्रीच्या बाजूने असं काहीतरी घडलं की त्याने मुद्दाम तो टी-शर्ट घालायचं ठरवलं.

“समोरून अशा काही गोष्टी घडल्या होत्या. खरं तर आधी माझी इच्छा नव्हती. पण मग जे घडलं त्यानंतर मी विचार केला की बास. आता मी मुद्दाम घालणार. मला कुणाची पर्वा नाही. मी कुणालाही शिवीगाळ गेली नाही, मला फक्त एक मेसेज द्यायचा होता,” असं युजवेंद्र म्हणाला.

Yuzvendra Chahal Be Your Own Sugar Daddy t shirt
युजवेंद्र चहलचा कोर्टाबाहेरचा फोटो (सौजन्य – सोशल मीडिया)

धनश्रीने ६० कोटी रुपयांची पोटगी मागितली होती, अशा चर्चा होत्या. या नंतर तिच्या कुटुंबाने फेटाळून लावल्या होत्या. याबद्दलही चहलने प्रतिक्रिया दिली. पोटगीच्या रकमेबद्दल बरीच चर्चा झाली होती. “पोटगीच्या वाटाघाटीची प्रक्रिया खूप कठीण होती. पण शेवटी मी एक चांगली डील केली,” असं युजवेंद्र म्हणाला. मात्र त्याने याबद्दल सविस्तर बोलणं टाळलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर काही काळाने या जोडप्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली. पण जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत सोशल मीडियावर आनंदी जोडपं असल्यासारखं वागायचं, असा निर्णय घेतला होता, असा खुलासा युजवेंद्र चहलने केला.