भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा एक उत्तम डान्सर आहे. ती नेहमीच आपले डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिच्या डान्स व्हिडीओमुळे ती सतत चर्चेत देखील असते. नुकताच धनश्री आणि क्रिकेटर श्रेयस अय्यरचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

श्रेयसने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रेयस आणि धनश्री उत्तम डान्स करताना दिसत आहेत. ते दोघे रोझेस या गाण्यावर डान्स करत आहेत. “आमच्या पायांचा विचार करत आहात” अशा आशयाचं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करत श्रेयसने दिले आहे. या व्हिडीओला ४ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले असून त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

धनश्री एक डॉक्टर असून ती एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून काम करते. धनश्रीचा स्वतःचा एक डान्स स्टुडीओ देखील आहे. याव्यतिरिक्त धनश्रीचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल आहे. तिच्या यू-ट्यूब चॅनेलचे २० लाखा पेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत. धनश्री आणि युजवेंद्र चहलने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये लग्न झालं आहे.