छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘देवमाणूस’ला ओळखले जाते. ‘देवमाणूस’ या मालिकेने ऑगस्ट २०२१ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या प्रमुख भूमिकेत असलेला अजितकुमार देवचा मृत्यू होणार आहे.

नुकतंच झी मराठीने या मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला डिंपल ही रिबीन कापत एका पतसंस्थेचे उद्धाटन करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अजितकुमार देव हा डिंपलला आता पैशाचा पाऊस पडणार असे सांगताना दिसत आहे. तर दुसरीकडे डिंपलची आई ही अजितकुमारच्या हातावर साखर ठेवते आणि आता सर्व काही व्यवस्थित होईल मग वाटत कसली बघताय लवकर लग्न करुन टाका, असं सांगते.

यानंतर अजितकुमारला एक मुलगी तुम्ही माझ्याशी लग्न करणार का? असं विचारते. त्यावर तो मला तुमच्या आईला विचारावं लागेल असं सांगतो. तर दुसरीकडे अजितकुमार देव आणि डिंपल लग्न करुन आले असून त्यांना डिंपलची आई ओवाळताना दिसत आहे. यानंतर अजितकुमार डिंपलला म्हणतो, मी तुला म्हणालो होतो की पैशांचा पाऊस पाडेन. असं म्हणताच तो पैसे उडवतो. यानंतर डिंपल एका जंगलात बसल्याचे दिसत आहे. तर अजित कुमार हा धावताना दिसत आहे. त्यानंतर अजितकुमारवर कोणीतरी बंदुकीने गोळी चालवताना दिसत असून तो खड्ड्यात पडताना दिसत आहे, असा थरार या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

“मी त्याला थेट ब्लॉक करणार…”, फरहान अख्तरच्या लग्नानंतर पूर्वाश्रमीच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला झी मराठीने थरारक कॅप्शनही दिले आहे. “पैसा, नवं सावज, लग्न आणि जीवघेणा हल्ला!!” असेही यात म्हटले आहे. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजित कुमारचा मृत्यू होणार की नाही असा प्रश्न पडला आहे. तसेच त्याच्यावर गोळी कोण चालवणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे ही अजितकुमारची नवी खेळी आहे, असेही म्हटलं जात आहे.