News Flash

२८७. नामानिराळा

मी अत्यंत सामान्य असूनही स्वत:ला महान समजतो.

मी अत्यंत सामान्य असूनही स्वत:ला महान समजतो. त्यामुळे वरकरणी सामान्य भासत असूनही प्रत्यक्षात विराट असलेल्या नामाचं महत्व मला उमगत नाही. दुसरम्य़ानं मला दिलेल्या नावाबद्दल मला आत्मीयता वाटते, पण परमात्म्याचं नाम मला परकं वाटतं. माझं जगणं क्षणभंगूर आहे, म्हणजेच ते कोणत्या क्षणी संपेल याचा भरंवसा नाही. तरीही माझं नाव या दुनियेत टिकून राहावं, अशी माझी धडपड आहे. मग जो अनादि—अनंत आहे, म्हणजेच या सृष्टीच्याही आधीपासून आहे आणि नंतरही राहणार आहे, त्या परमात्म्याच्या शाश्व्त नामाची मात्र मला गोडी नाही. माझ्या नावाचा गवगवा व्हावा, अशी माझी सुप्त इच्छा असते, पण भगवंताचं नाम घ्यावं आणि गावं, असं मला वाटत नाही. अशी ज्याची मनोवृत्ती आहे त्याला समर्थानी ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे ९०व्या ोकात फटकारलं आहे. हा ोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा ोक असा आहे :

न ये राम वाणी तया थोर हाणी।

जनीं व्यर्थ प्राणी तया नाम काणी।

हरीनाम हें वेदशाष्टद्धr(२२९ीं पुराणीं।

बहू आगळें बोलिली व्यासवाणी।। ९० ।।

प्रचलित अर्थ : ज्याच्या मुखी रामनाम येत नाही त्याचा मोठा घात आहे. जनांत त्याचे आयुष्य व्यर्थ आहे. त्याला नामस्मरण हे काणी म्हणजे क्लेशदायक वाटते. हरिनाम हे बहू आगळे म्हणजे श्रेष्ठ आहे, असं वेदशास्त्रंनी आणि पुराणांत व्यासांनी सांगितलं आहे.

आता मननार्थाकडे वळू. इथं ‘ न ये राम मुखी तया थोर हाणी’, असं म्हटलेलं नाही, तर ‘न ये राम वाणी तया थोर हाणी’ म्हटलेलं आहे. म्हणजेच केवळ मुखानं होणारा नामोच्चार इथं अभिप्रेत नाही. ही ‘वाणी’ आणखीनच व्यापक असली पाहिजे. ती कोणती, हे जाणण्याआधी ही वाणी ज्या शरीरात आहे त्याकडे लक्ष देऊ. ‘अथर्ववेदा’त ‘केन सूक्त’ म्हणून एक सूक्त आहे. ‘केन’ म्हणजे कोणी. त्या सूक्तात मानवी शरीराची संपूर्ण अंतर्गत रचना मांडली आहे आणि हे कोणी घडवलं, हे कोणी बनवलं, असे प्रश्न करीत या अद्भुत देहाला घडविणारम्य़ा परमेश्व्राकडे लक्ष वेधलं आहे. ही शरीराची अंतर्गत रचना मांडतानाच हाडं, मांस, रक्त असलेल्या या शरीरात प्रेम कोणी निर्माण केलं, वात्सल्य कोणी ठेवलं, कारुण्य कोणी उत्पन्न केलं, असे प्रश्नही विचारले आहेत. आपण हे जाणतोच की या शरीरात जसं प्रेम आहे, तसाच वैरभावही आहे. कारुण्य आहे, तसाच द्वेषही आहे. अनुकंपा आहे तसाच मत्सरही आहे. अंतरंगातला हा जो प्रेमभाव आहे, कारुण्य आहे, मत्सर आहे, वैरभाव आहे; त्याचं पोषण विचारानुरूप, भावनेनुरूप, कल्पनेनुरूप होतं. आणि भावना, विचार, कल्पना यांचा आधार शब्द हाच असतो. शब्दांच्या आधाराशिवाय विचार होऊ शकत नाही, कल्पना विकसित होत नाहीत, भावनेचं पोषण होत नाही. भावपोषण ही अत्यन्त सूक्ष्म प्रRिया मनात सुरु असते आणि शब्दांद्वारे ती घडत असते. मनातलं त्याबाबतचं सारं चिंतन, मनन म्हणजे आत्मसंवादच असतो. त्या आधारे आपण प्रत्यक्षात बोलतो, व्यक्त होतो. हे जे व्यक्त होणं आहे ते वैखरी वाणीच्या आधारे आहे. त्याआधीचा जो अव्यक्त संवाद आहे तो अव्यक्त वाणीद्वारे सुरु असतो. मध्यमा आणि पश्यन्ति ही वाणीची दोन आंतरिक सूक्ष्म रूपं आहेत. या सर्व वाणींचा उगम अशी जी अखेरची परा वाणी आहे ती स्फुरणरूप आहे. अर्थात जसं आंतरिक स्फुरण असतं तसा विचारतरंग पश्यन्तीमध्ये उत्पन्न होतो. त्या विचारतरंगानुरूप मध्यमेत तो विचार, कल्पना पक्व होतात आणि मग योग्यायोग्यतेनुसार वैखरीद्वारे तो विचार किंवा कल्पना व्यक्त होते. तर वाणीच्या या चारही रूपांत ‘रामा’चं अर्थात सद्गुरुचं स्मरण हा जर पाया ठरला तर जीवनातली विसंगती कमी होऊ लागते. जर असं स्मरण नसेल, वाणीला जर ‘रामा’चा अर्थात शाश्व्ताचा स्पर्श नसेल, तर ‘मी’पणानं ती भरून जाते. मग त्या जीवनांत अहंकारामुळे भ्रम, मोह, अज्ञान वाढत जाते. त्यामुळे जीवन विसंगती, हानी, दु:ख आणि क्लेशानं व्यापून जातं. समर्थही म्हणूनच सावधगिरीचा इशारा देत बजावतात की, “न ये राम वाणी तया थोर हाणी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 2:30 am

Web Title: samarth ramdas philosophy 186
Next Stories
1 २८६. तळमळ
2 २८५. जनी-भोजनी
3 २८४. भान
Just Now!
X