रूग्ण – डॉक्टर, दात काढायला साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर – एक दात काढायला एक हजार लागतील
रूग्ण – एक हजार जरा जास्त वाततात…
डॉक्टर – अॅनेस्थेसिया करायचे पाचशे रूपये आणि दात काढायचे पाचशे रूपये होतात.
रूग्ण – काही कमी करता येणार नाही का?
डॉक्टर – (रागावून) अॅनेस्थेसिया न करता माझा एक विद्यार्थी हातोडीच्या साह्याने १०० रूपयांत दात काढून देतो.