‘साड्यांचा रंग जाणार, नाही गेल्यास पैसे परत.’

दुकानावरील पाटी वाचून साड्या खरेदीसाठी झुंबड उडाली…

पण वापरून पाहतात तो काय, पहिल्या धुलाईतच साड्यांचा रंग गेला…

संतापलेल्या महिला दुकानदाराकडे गेल्या आणि त्याला जाब विचारू लागल्या…

दुकानदाराने शांतपणे डोके खाजवत त्या पाटीकडे बोट दाखवले…

त्यावर लिहिले होते..

‘साड्यांचा रंग जाणार, नाही गेल्यास पैसे परत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(तात्पर्य : विरामचिन्हे केवळ मोकळ्या जागा भरण्यासाठी नसतात!)